
सर्व सन्माननीय भागधारक, सभासद व ग्राहक मित्रांनो,
महात्मा फुले बँकेची स्थापना दिनांक 10 मार्च 2000 रोजी स्व. मा. श्री. दादासाहेब उर्फ विनायकराव कोरडे (माजी राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या दूरदृष्टी व प्रेरणेने झाली. त्यांच्या स्वप्नातील बँक आज आपल्या सहकार्यासह अनेक स्तरावर पुरस्कार प्राप्त करणारी आणि सतत ‘अ’ अंकेशन वर्ग मिळवणारी बँक म्हणून ओळखली जाते.
आज आपल्या बँकेच्या अमरावती, अचलपूर, वरूड, चांदुर बाजार, मोर्शी, यवतमाळ, रहाटगाव, अंजनगाव सुर्जी व आकोट येथील शाखा सुरळीत कामकाज करत आहेत. लवकरच इतर जिल्ह्यांमध्येही शाखा सुरू करून आपली सेवा सर्वत्र पोहोचविण्याचा आम्ही निर्धार केला आहे.
बँकेची ही प्रगती आणि यश केवळ माझ्या अथवा संचालक मंडळाच्या मार्गदर्शनामुळे नव्हे, तर आपल्या सर्व सभासद व ग्राहकांच्या सततच्या विश्वास, सहकार्य व प्रेमामुळेच शक्य झाले आहे. आपण असा सहकार्य कायम ठेवत राहाल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.
आपल्या बँकेची प्रगती आणि विश्वास यासाठी आपले मनःपूर्वक आभार. भविष्यातही आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.